रुईत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रुई ता.२५ ( वार्ताहर )

येथील छ. शिवाजी महाराज चौकातील मराठा युवा शक्ती या मंडळाच्या वतीने चालू वर्षी १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या ५० हून अधिक गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. कोरोनाचे वाढते समूह संसर्ग लक्षात रुई गावामध्ये यावर्षी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. गावातील मुख्य छ. शिवाजी महाराज चौकात मराठा युवा शक्ती या मंडळाने शासनाने व हातकणंगले पोलिस स्टेशनच्या वतीने दिल्या गेलेल्या नियमानुसार गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. 

      कोरोनाच्या काळात योग्य ती खबरदारी घेत व अनावश्यक खर्च टाळून गावातील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप पत्रकारांच्या हस्ते दि. २३ रोजी करण्यात आले. दरम्यान चालू वर्षी १० वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ५० हुन अधिक विद्यार्थी पण गर्दी न व्हावी याकरीता दि. २५ रोजी त्यापैकी ५ विद्यार्थी व विद्यार्थीनींचा उद्योगपती सचिन लाड, पत्रकार राकेश खाडे व राजू कांबळे यांच्या हस्ते वह्या, पेन, सॅनिटायझर, मास्क व रोप देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली. उर्वरित विद्यार्थ्यांचा सत्कार घरीच जावून करणार असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली.

     कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष महेश झपाटे, रवी सूर्यवंशी, सुरज जाधव, अभि अपराध, राजू सूर्यवंशी, अभि सुर्वे, कुबेर सुर्वे, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!