बेळगांव / प्रतिनिधी
गणेशोत्सव आला की प्रत्येकाच्या घरी व सोशल मिडिया वरती पारंपरिक गणरायाची गाणी वाजुन घुमु लागतात. मात्र या वर्षी सोशल मिडीयावरती ‘बाल भक्ता लागे तुझी आसरा ‘ हे गाणं ऐकायला व पहायला मिळत आहे .
यंदा बेळगावच्या युवकांनी एकत्र येऊन ‘बाल भक्ता लागे तुझी आसरा ‘ या गाण्याची निर्मीती करून त्याला अप्रतिम आकार दिला . जगातील गणेशभक्तांकडून अवघ्या एका आठवड्यामध्ये सात लाख व्हुवज् (views) सत्तावीस हजार पसंती (लाईक ) मिळविल्या आहेत. अल्पावधीत गाण्याने जगभरातील अनेक गणेश भक्ताची मने जिंकली आहेत.
कार्तिक केडी निर्मीत ,डिजे कार्तिक केडी या यूट्यूब चॅनलवरती हे गाणं प्रसिद्ध करण्यात आले आहे. जोत्स्ना क्षीरसागर यांनी हे गाणं गायलं असून रेकॉर्डिंग अनिल मलखन्नशवर यांनी केले आहे.

गायिका जोत्स्ना क्षिरसागर ह्या बेळगावमधील गुरूप्रसाद कॉलनी मध्ये राहत असून त्यांना लहानपणापासून गायनाची खुप आवड आहे. लहानपणापासून त्यांनी निर्मला प्रकाश व अर्चना बेळगुंदी यांच्याकडुन गायणाचे धडे घेत आहेत. याचे संपुर्ण चित्रीकरण शिवबसव नगर येथील ज्योतिबा मंदीर व भवानीनगर येथील गणपती मंदिरात केले आहे. जोत्स्ना यांना आई, वडील व प्रमोद कुलकर्णी यांचेही मार्गदर्शन लाभले आहे .