हातकणंगले/ दि.26-प्रतिनिधी
कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डॉ. केदार साळूंखे (वय-८ वर्ष) यानी पोलीस आणि डॉक्टरच्या वेशातील गणेश मुर्तीचे साधेपणाने प्रतिष्ठापना करून या गणेश चतुर्थी मध्ये राज्यासह जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून या कोरोनाची साखळी रोखण्यासाठी कार्यरत असलेले कोरना योद्धा डॉक्टर्स, पोलीस ,सफाई कर्मचारी अशा वर्कर अंगणवाडी सेविका यांच्या कार्या बद्दल कृतज्ञता गणपतीच्या देखाव्यामधून व्यक्त करून सन्मान केला आहे.
त्याचबरोबर नियम पाळा . कोरोना टाळा. घरी रहा . सुरक्षित रहा . असे प्रभोधनत्मक संदेश देऊन, हे बुद्धिदेवता ज्ञान मंदिराचे दरवाजे उघडू दे आता, हे विघ्नहर्ता ही मैदाने मोकळी का सर्व विघ्न दूर कर खेळू बागडू द्या . आम्हाला असे साकडे ही श्री गणेशाला घालण्यात आले आहे.
