कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार संजीत जगताप यांचा ह्रदय विकाराच्या धक्याने मृत्यू

पुलाची शिरोली / ता .२७ – प्रतिनिधी

      शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार संजीत जगताप यांचा घोडावत कोविड सेंटरमध्ये ह्रदय विकाराच्या धक्याने मृत्यू झाला . कोरोणा पाॅझिटीव्ह असल्याने त्यांच्यावर सोमवार पासून उपचार सुरू होते .
      शिरोली पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार अशी त्यांनी ओळख होती . काही दिवसांपूर्वी अशक्त वाटू लागल्याने ते आजारी होते. त्यांनी डाॅक्टरांच्या सल्यानुसार घोडावत कोविड सेंटरमध्ये आपला स्वॅब तपासणीसाठी दिल्याने त्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. त्यांच्यावर कोरोणाचा उपचार सुरू होते. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवण करून आपल्या रूममध्ये जाण्याअगोदर डाॅक्टरांनी त्यांच्या आरोग्यविषयी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी तब्येत बरी असल्याचे सांगून रूममध्ये गेले त्याच वेळी त्याना ह्रदय विकारांचा जोराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला . या दुःखद घटनेने शिरोली पोलिस ठाण्यात शोककळा पसरली आहे .
    घोडावत येथील डॉ. उत्तम मदने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांची तपासणी केली होती . ते पाँझिटिव्ह जरी असले तरी त्यांना फारसी लक्षणे नव्हती . त्यांची प्रकृती चांगली होती . पण ते जेवण करुन खोलीत गेले असता तात्काळ खाली कोसळले . आम्ही जाऊन तात्काळ उपचाराचे प्रयत्न केले . पण त्यांचा मृत्यू झाला असे सांगितले.
     शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना परिसरातील घडामोडीमुळे कामाचा ताण नेहमीच असतो . सर्वच आपत्तीच्या काळात त्यांना फार जोखमीचे काम असते . आणखी तीन कर्मचाऱ्यांना या कोरोनाच्या महामारीची लागण झाली आहे. यापैकी जगताप यांचा बुधवारी मृत्यू झाल्याने पोलीसात प्रचंड घबराट पसरली आहे.

error: Content is protected !!