आजपासुन शिरोली सलग पाच दिवस लॉकडाऊन ; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

पुलाची शिरोली/ता. २७-प्रतिनिधी

      गावातील कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येची गांभीर्याने दखल घेऊन शुक्रवार पासून सलग पाच दिवस संपूर्ण गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत राञी उशिरा दक्षता समितीची आॅनलाईन मिटींग होवून निर्णय घेण्यात आला.
गेल्या पंधरा दिवसापासून शिरोली गावात दररोज नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या गावात सुमारे ऐकशे वीस रुग्ण आढळले आहेत. तसेच वेळेत उपचार न झाल्याने पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गावाच्या द्रुष्टीने अत्यंत दुर्दैवी व गंभीर बाब आहे. याबाबत दक्षता समिती सदस्य व शासकीय अधिकारी यांनी गांभीर्याने विचार करून हि साखळी तोडण्यासाठी कडक लाॅकडाऊन करण्यास मान्यता दिली.
    सरपंच शशिकांत खवरे यांनी दवाखान्यातून पाच दिवस लाॅकडाऊनची घोषणा केली. यामध्ये दवाखाना, औषध दुकाने, दूध संकलन सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित सर्व व्यवसाय बंद करण्याचे जाहीर केले आहे. याला गावातील सर्व नागरिक, व्यावसायिक, उद्योजक, संस्था प्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन खवरे यांनी केले.
  चर्चेमध्ये माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.जेसिका अॅंन्ड्रूस, ग्रामविकास अधिकारी ऐ. एस.कठारे, तलाठी निलेश चौगुले, सदस्य प्रकाश कौंदाडे, बाजीराव पाटील, सतिश पाटील, मुकूंद नाळे, बाबासाहेब कांबळे, उत्तम पाटील, जोतिराम पोर्लेकर , पञकार, यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!