भुदरगड तालुक्यात घरगुती गणरायाला भावपुर्ण निरोप ;गारगोटी ग्रामपंचायतीने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केले काटेकोर नियोजन ,गर्दी व मिरवणूक नाहीच.

गारगोटी / ता.२७ (प्रतिनिधी)

       गारगोटीसह भुदरगड तालुक्यात आज भक्तीभावाने घरगुती गणरायाचे ग्रामपंचायतीच्या कुंडात विसर्जन करणेत आले . गेले सहा दिवस घरामध्ये विराजमान झालेल्या गणरायाला कोरोनाचे विघ्न टाळण्याचे साकडं घालत आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देत भावपुर्ण वातावरणात निरोप देणेत आला.

गारगोटीत गणेशभक्तांनी ग्रामपंचायतीनकडे गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुपूर्द केल्या

        गारगोटी शहरात गर्दी टाळण्यासाठी ठिकठिकाणी गणपती विसर्जनाची सोय केली होती. त्यामुळे गारगोटी तसेच तालुक्यात नदी काठावर गर्दी झालीच नाही. गणेशाचे आगमनानंतर गेले सहा दिवस घराघरांमध्ये आरतीचे सूर आणि मंगलमय वातावरण होते, घरगुती गणेशाचे विसर्जन असलेने आज सकाळपासूनच घराघरात विसर्जनाची लगबग सुरू होती, पूजाअर्चा यासह आरतीचे सूर ऐकावयास मिळत होते, त्यातच कोरोनाची भीती असलेने गणरायाला कोरोना हटू दे . असे साकडे घातले जात होते.
       कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी नियोजन केले होते, गारगोटी येथे ग्रामपंचायतीने ज्या त्या गल्लीमध्ये वेळापत्रक निश्चित केले होते, सकाळी दहा पासून घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली, ग्रामपंचायतीने गणेशभक्तांनी गणेशमूर्तींचे वेदगंगा नदीत गणेश विसर्जन करू नये . व कोणीही नदी काठावर येऊ नये . असे आवाहन केले होते . त्यासाठी प्रत्येक गल्लीत, चौकात ग्रामपंचायतीने सजवलेली ट्रॅक्टर ट्रॉली ठेवली होती, तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी दिवसभर तिथे थांबून होते, तर काही वेळा गल्लीतून ट्रॅक्टर फिरवून मूर्ती दान व विसर्जनाचे आवाहन केले जात होते, लोकांनी याला १०० % प्रतिसाद दिला .
        आज सकाळी श्री मौनी विद्यापीठाचे पारंपरिक गणेशाची पूजा व आरती संचालक डॉ. आर. डी. बेलेकर यांचे हस्ते झाली, यावेळी प्रा. आनंद चव्हाण, मुख्याध्यापक दिपक मोरे, संजय डवरी, अरविंद पलंगे, मुल्ला यांचेसह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते, यावेळी गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे यांचेकडे विसर्जनासाठी गणेशमूर्ती सुपूर्द करणेत आली.

ग्रामपंचायत सदस्यांनी प्रथम अशारितीने गणेशमूर्ती आपल्या दारातच बादलीत विसर्जन करून सुपूर्द केली.

error: Content is protected !!