३६ दूध संस्थांना गोकुळचे अ वर्ग सभासदत्व मंजूर…

संचालक मा.आम डॉ. सुजित मिणचेकर यांची माहिती

हातकणंगले प्रतिनिधी:-
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ, कोल्हापूर ( गोकुळ ) मध्ये हातकणंगले तालुक्यातील अनेक दूध संस्था गेली अनेक वर्षे दूध पुरवठा करीत आहेत परंतु आज पर्यंत त्यांना गोकुळ संघाचे अ वर्ग सभासदत्व प्राप्त झालेले नव्हते त्यांना मी संचालक झालेनंतर हातकणंगले तालुक्यातील ३६ संस्थांना अ वर्ग सभासदत्व मंजूर करून दिले आहे अशी माहिती गोकुळ दूध संघाचे संचालक माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी दिली ते जनसंपर्क कार्यालयात आयोजित संस्थांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते.

हातकणंगले तालुक्यातील अनेक संस्था गोकुळ दूध संघाला बरेच वर्षे दूध पुरवठा करूनदेखील अ वर्गामध्ये रूपांतर व मतदानापासून वंचित होत्या अशा ३६ संस्थांना अ वर्गामध्ये रूपांतरित करून त्यापैकी ३३ संस्थांना मतदानाचा हक्क देखील मिळाला आहे. त्या सर्व संस्थांना गोकुळचे संचालक माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दरम्यान बोलताना डॉ. मिणचेकर म्हणाले गोकुळच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व योजना या दूध उत्पादक शेतकरी यांना मिळवून देण्यासाठी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे व म्हैस दूध वाढीसाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, माजी जिल्हापरिषद सदस्य महेश चव्हाण व विश्वासराव इंगवले होते. तसेच सर्व संस्थांचे चेअरमन व सचिव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!