नवी दिल्ली/ प्रतिनिधी
शेतकरी कायदा (agriculture act 2020) रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या (Delhi) सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या सुद्धा शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत.

विरोधी पक्षांच्या खासदारांचं एक शिष्टमंडळ हे गाझीपूरच्या सीमाभागात पोहोचलेला आहे. शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हे शिष्टमंडळ पोहोचला आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस शिवाय जवळपास 10 विरोधी पक्षाचे 15 पेक्षा जास्त नेते पोहचले आहे.
2 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात विनायक राऊत,अनिल देसाई, अरविंद सावंत,राजन विचारे, प्रताप जाधव, कृपाल तुमाने आदींचा समावेश होता. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर इथं पोहोचले आहे.
