हत्ती हा तसा शांतताप्रिय प्राणी आहे परंतु जर त्याच्या मनासारखे नाही झाले अथवा त्याला डिवचले गेले तर हत्तींचे कळप मानवी वस्तीवर चाल करून येत राहतात. हत्तींच्या कळपाविषयी भरपूर मजेशीर गोष्टी आपण नेहमी ऐकतो. हत्तीचे कळप हे नेहमी त्यांच्या माद्यांकडून चालवले जातात, हत्ती फार कमी झोप घेतात त्यांच्याविषयी एक गोष्ट प्रामुख्याने पाहता येते ते म्हणजे हत्ती (elephant) अत्यंत भावनाशील असतात.
आपल्या देशात आणि तसं बघायला गेलं तर जगभरात मानवी वस्ती वाढली तसे प्राण्यांचे आवास उध्वस्त झाले, जंगलांना खेटून मानवी वस्ती वाढल्या. प्राण्यांची घरे उध्वस्त करून त्यावर माणसानी आपली घरे बांधली जेंव्हा प्राणी आपली नेहमीची जागा म्हणून मानवी वस्तीना भेटी देवू लागले त्यातून संघर्ष उद्भवले.

अगदी हत्तींच्या बाबत बोलायचं झाल तर आपल्या भारतात हत्तींना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या जंगलातील जागा, त्यांचे येण्याजाण्याचे रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी भारत सरकार ने बरेच प्रयत्न केले आहेत.
भारतात रस्त्यांचे आणि रेल्वेंचे जाळे दाट आहे. अनेक वेळा जंगलातून रस्ते आणि रेल्वेंचे रूळ टाकले जातात. भारतात अनेक राज्यात जिथे जंगल प्रदेश जास्त आहे त्या ठिकाणी जंगलातून वाटू काढून रस्ते बनवले गेले आहेत आणि रेल्वेंचे रूळ टाकले गेले आहेत. अशा ठिकाणी अनेक वेळा हत्तींचे कळप रस्ता क्रॉस करतात रेल्वेंच्या रूळावर येतात.
आपल्या काही रेल्वे कर्मचाऱ्यांचा हा एक कायमचा अतिरिक्त जॉब होवून बसला आहे. अनेक वेळा जंगलामध्ये तैनात असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना हत्तींच्या कळपावर नजर ठेवावी लागते. रेल्वेची येण्याची आणि जाण्याची वेळ आणि या हत्तींची रूळ ओलांडण्याची वेळ अनेकदा एकच येते त्यावेळी रेल्वेच्या होणाऱ्या संभाव्य धडकेपासून हत्तीला वाचवणे हे या कर्मचाऱ्यांसाठी जिकीरीचे काम होवून बसते.
कधी कधी त्यांना हे धडक टाळण्यात यश येते. कधी कधी निम्म्या रात्री अशा ट्रेन ची वेळ आणि हत्तींची वेळ एकाच आली तर फार दुर्दैवी अपघात घडतात.
या अशा गोष्टी होवू नयेत म्हणून मुरादाबादच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी एक नामी युक्ती शोधून काढली आहे. त्यांनी ज्या ठिकाणी रेल्वेचे रूळ आहेत आणि ज्या ठिकाणाहून हे रेल्वेचे रूळ क्रॉस करण्यासाठी हत्ती अथवा त्यांचे कळप येत राहतात त्या ठिकाणी साउंड बसवले आहेत. त्या ऑडीओ प्लेअर मधून मधमाशांचा ध्वनी रेकोर्ड करून तो वाजवला जातो. ज्या ज्या वेळी ट्रेन त्या मार्गावरून येतात त्यांच्या येण्याच्या अगोदर हा मधमाशांचा आवाज वाजवला जातो.

आता तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटलं असेल की मधमाशांचा ऑडीओ का? काय संबंध आहे मधमाशांच्या आवाजाचा? हत्तीला मधमाशांची allergy असते का? तर साधारणपणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे असे म्हणावे लागेल. कारण ही साउंड सिस्टीम बसावाल्यापासून गेल्या २ वर्षामध्ये हत्तींचे एकही अपघात झालेले नाहीत.
हत्तींचे अपघात का होतात? आपल्याला ट्रेनचा आवाज ऐकू आला तर आपण रूळ ओलांडत नाहीत. हे मात्र या प्राण्यांच्या बाबतीत होत नाही. त्यांना आवाज ऐकू आला तरी त्यांना त्यामागचा धोका काळात नाही. रेल्वेची शिट्टी ऐकू आल्यावर आपल्या मनात रेल्वेची प्रतिकृती तयार होते, तिचा अवाढव्य आकार येतो, तिचा वेग आपल्या कानात आणि डोळ्यासमोर गुंजत राहतो, मन धोक्याची जाणीव देते, त्यामुळे आपण रेल्वे रूळ रेल्वे येण्याच्या अगोदर कधीही ओलांडत नाही.
परंतु ही पंचेंद्रिय आपल्याला जशी मदत करतात तसे प्राण्यांच्या बाबतीत नसते त्यांना ट्रेन चा धोका लक्षात येत नाही, ट्रेन च्या शिट्टीचा आवाज आला तरी हे प्राणी निवांतपणे रूळ ओलांडत राहतात त्यामुळे अपघात होत राहतात.
१९८७ पासून भारतात जवळ जवळ २६६ हत्तींचा या ट्रेन च्या धडकेमुळे मृत्यू झालाय. २०१२ ते २०१८ च्या दरम्यान जवळपास ३० वेळा पश्चिम बंगाल मध्ये असे प्रसंग घडले जेंव्हा हत्ती रेल्वे रूळावर अडकून पडले होते आणि ट्रेनचा अपघात होता होता वाचला होता.
पहिली साउंड सिस्टीम ही हरिद्वार देहरादून रेल्वे मार्गावर बसवली गेलेली होती. ह्या मार्गावर राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे त्यामुळे या मार्गावरून जंगली प्राण्याची नेहमी ये जा चालत राहते. ही सुविधा रेल्वे खाते आणि आपल्या देशाचे जंगल खाते यांनी संयुक्तपणे मिळून राबवली आहे. यानंतर जवळ जवळ ५० ठिकाणी या सिस्टीम बसवल्या गेल्या आहेत जिथे जिथे जंगली प्राण्याची रेल्वे रुळावरून ये जा चालू राहते.
ट्रेन येण्याच्या अगोदर या साउंड सिस्टीम चालू होतात आणि त्यातून मधमाशा गुणगुणायला लागल्याचा आवाज येतो. हा आवाज हत्तींना २००० फुट लांबपर्यंत च्या पल्ल्यात असणाऱ्या हत्तींना ऐकू जातो आणि ते सतर्क होतात. आपला मार्ग बदलतात किंवा थांबून अंदाज घेत राहतात.
संग्रहित माहिती
