हातकणंगले /प्रतिनिधि
कोरोना कालावधीमध्ये सर्व घटकांना व उदयोगांना सरकारच्या वतीने मदत करण्यात येत आहे. या काळात देशाचा चौथा स्तंभ दुर्लक्षीत झालेला आहे. सरकारने पत्रकारांच्या उदरनिर्वाससाठी किमान पाचशे कोटीचे पॅकेज जाहिर करून प्रत्येक पत्रकाराच्या खात्यावर १० हाजार रुपये जमा करावे अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे इतर उद्योगाप्रमाणे पत्रकारीतेतील व्यवसायांना सुद्धा कोरोना सारख्या महामरीचा फटका बसलेला आहे. सरसकट पत्रकारांना सरकारने मदत करावी. पत्रकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. छोटी मोटी वृतपत्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत. समाजाला दिशा देणारा पत्रकार आज पोटाची खळगी भरण्यासाठी दिशाहिन झालेला आहे. कोरोना काळात पत्रकारीतेला जिवनदान देण्यासाठी शासनाने पाचशे कोटीचे पॅकेज जाहिर करावे अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.