नरंदे/प्रतिनिधी
शेतकर्यांच्या उसाला प्रतिटन तीन हजार रुपये दर देण्यासाठी साखरेचा दर किमान तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मिळाला पाहिजे. मागील ऊस गाळप हंगामात साखरेचा व कच्च्या मालाचा दर एकच राहीला. यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली. ऊस शेती वाचविण्यासाठी सहकारी साखर कारखानदारी जिवंत राहिली पाहिजे, असे स्पष्ट मत आरोग्य व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले.
नरंदे (ता. हातकणंगले) येथे शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हा.चेअरमन थबा कांबळे, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौगुले, शिरोळ पंचायत समितीच्या सभापती कविता चौगुले, आदित्य पाटील यड्रावकर नरंदेचे सरपंच रवींद्र अनुसे, संचालक डी.बी.पिष्टे, बबनराव भंडारी आदि उपस्थित होते.
शरद सहकारी साखर कारखान्याच्या 19 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व सौ. स्वरूपा पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते.
यानंतर झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चेअरमन नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, मागील गळीत हंगाम अत्यंत कठीण काळात पार पडला. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. परंतु अडचणींचा सामना करून शरद कारखान्याने मागील वर्षी एकरकमी एफ आर पी ऊस उत्पादकांना दिली आहे. निसर्गाच्या प्रकोपाच्या काळात ऊस हे उत्पन्न देणारे शाश्वत पीक ठरले आहे. त्यामुळे उसाच्या पिकाने हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील ऊस उत्पादकांना हात दिला आहे. तसेच कारखाना कामगारांना 21 टक्के बोनस देणार असल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जाहीर केले.
यावेळी स्वागत संचालक प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी केले. आभार सुभाषसिंह रजपूत यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले. यावेळी संचालक आप्पासाहेब चौगुले, रावसाहेब चौगुले, गुंडा इरकर, अजित उपाध्ये, संजय नांदणे, शिवगोंडा पाटील, आण्णासो सुतार, जि.प. सदस्य अरुण पाटील, सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, अभिजित भंडारी, जवाहर पाटील, अक्षय आलासे, धनपाल आलासे, तानाजी आलासे, दशरथ काळे, विद्याधर कुलकर्णी, सौ. मिनाक्षी कुरडे, प.स. सदस्या मिनाज जमादार, सर्जेराव शिंदे, केशव राऊत, विकास कांबळे, भूपाल विभूते, शकील गैबान, फारुक पठाण, बाळासो वगरे, युनूस डांगे, शंकरराव कलकुुटगी, बाळासो दिवटे, संभाजी मोरे, गुंडाप्पा पवार, आण्णासो चौगुले, सुनिल पाटील मजलेकर, अनंत धनवडे, हरिशचंद्र पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.एन. डिग्रजे, सीईओ बी.ए.आवटी, जी.एम. टेक्नी मारुतराव जाधव, चिफ केमिस्ट संजय साळवे, ओएस अनिल पाटील, सीए आर.बी. पाटील, सी.ए. चंद्रकांत बिरनाळे, शेती अधिकारी महावीर ऐनापुरे, पी.ओ. बळवंत बेलेकर यासह मान्यवर उपस्थित होते.