हातकणंगले
मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी . या मागणीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने सोमवार ता.५ ऑक्टोबर रोजी हातकणंगलेतील तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. अॅड. संग्रामसिंह निंबाळकर, भाऊसाहेब फास्के, सुनील काटकर,दीपक कुन्नुरे ,पंडित निंबाळकर,शिवाजीराव माने, गजानन खोत, बी.एम. पाटील, अमित गर्जे यांनी मनोगत व्यक्त केले.
नगरसेवक दिनानाथ मोरे, नगरसेवक अभिजित लुगडे,माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, कृष्णात जाधव, रणजित लुगडे,स्वप्नील करडे, प्रदीप शिंदे , अक्षय कदम आदी उपस्थित होते.पंडित निंबाळकर यांनी आभार मानले.