अट्टल चोरट्याकडून ५ गुन्हे उघडकीस

सांगली येथील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणचे बंद फ्लॅट फोडून त्यातील ऐवज चोरणाऱ्या अट्टल चोरट्याकडून एलसीबीच्या पथकाने पाच गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील ७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील अट्टल चोरटा सुनिल नामदेव रुपनर (वय ३२, रा. कुपवाड) याच्यासह चोरीचे दागिणे खरेदी करणारा सराफ सुशिल संजय आपटे (वय २४, रा. गारपीर चौक, सांगली) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही कारवाई एलसीबीचे पो.नि. सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. नि. पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर लवटे, अमर नरळे आदींच्या पथकाने केली.

error: Content is protected !!