सांगली/प्रतिनिधी
104 माय एफएम आणि जे. डी. थोटे डेअरी आष्टा प्रस्तुत सायकलिंग विथ RJ हर्षदा उपक्रम दिनांक 3 ते 5 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात पार पडला.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी आरोग्यासाठी सायकलिंग खूप गरजेचे आहे. वाढते प्रदूषण व इंधनाची बचत यासाठी 104 माय एफएम सांगली यांच्या वतीने सायकलिंग विथ RJ हर्षदा हा उपक्रम घेण्यात आला. सायकल चलाव देश बचाव असा नारा देत 100 पेक्षा जास्त नागरिक, पोलीस, शासकीय अधिकारी त्यांच्यासह हा उपक्रम पार पडला. विश्रामबाग ते छत्रपती शिवाजी स्टेडियम पर्यंत सायकलींचा उपक्रम घेण्यात आला.

पहिल्या दिवशी पोलीस निरीक्षक अतुल तनपुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा देशमुख, आर्यन थोटे जे. डी. थोटे डेअरी आष्टा, सांगली मिरज कुपवाड महापालिका डॉक्टर वर्षा पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी व नागरिक यांनी मोठ्या आनंदात सहभाग घेतला.

उपक्रमांतर्गत एका गरजू विद्यार्थ्याला श्री किशोर लुल्ला यांच्या टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन च्या वतीने सायकल भेट देण्यात आली.
सांगली महापालिका उपयुक्त राहुल रोकडे, क्रीडा अधिकारी महेश पाटील, किरण आनंदे, कराटे मास्टर प्रथमेश लोंढे आणि टीम, झिन प्राची इनामदार, यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सांगता करण्यात आली.
तीन दिवस चाललेल्या या उपक्रमाला सांगलीकारांनी भरपूर प्रतिसाद दिला.