मोदींच्या नेतृत्वाखाली असलेले केंद्र सरकार म्हणजे भूलथापा मारणारे सरकार – मुरलीधर जाधव

इचलकरंजी/प्रतिनिधी

  सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला अनेक आश्वासने दिली होती त्यामध्ये महागाई कमी करू, प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यावर अमुक रक्कम जमा करू, इंधनाचे दर कमी करू पण सत्ता मिळताच स्वतःच्या आश्वासनाला हरताळ पासत पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरामध्ये भरमसाठ दरवाढ करून सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडण्याचे काम करीत आहेत असा आरोप जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव करून पुढे म्हणाले की,जर वेळीच केंद्रातील मोदी सरकारने इंधनाचे दर कमी नाही केले तर भविष्यात केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आज शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी प्रांताधिकारी कार्यालयावरील मोर्चा वेळी दिला.

    आज केंद शासनाने इंधनाच्या दरामध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेवराव गौड,तालुकाप्रमुख आनंद शेट्टी, शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडीला सुमोगाडी बांधून ढकलत नेऊन शिवसेना शहर कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय येथे महागाई विरोधात भव्य मोर्च्या काढुन निवेदन देण्यात आले या मोर्च्यामध्ये नगरसेवक रविंद्र माने,रविंद्र लोहार,भाऊसो आवळे,युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील,माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, महेश बोहरा, धनाजी मोरे,दत्ता साळोखे,संजय पाटील,बाळासो मधाळे, गणेशज जंगटे,लशुमन पाटील,अजयकुमार पाटील,आप्पासो पाटील,राजू मोकाशी,मनोज भाट, दिलीप शिंदे, राजू आरगे,बालाजी हुलेमनी, शिवानंद हिरेमठ,मेहबूब पठाण,इम्रान सनदी,विजय देवकर,भारत पोवार,मंगल मुसळे,मधुमती खराडे,शोभा गोरे, शोभा कोलप,आण्णासो बिल्लूरे,किशोर घडलिंग, सागर जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

error: Content is protected !!