अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने देशवासीयांच्या पाठीत खंजीर खुपसला – शिवसेना जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव

हुपरी /प्रतिनिधी

  केंद्र सरकारच्या अन्यायी व जुलमी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात हुपरी येथे शिवसेनेच्यावतीने बैलगाडी व मोटरसायकल ढकलत हल्लाबोल करण्यात आला. बैलगाडीने मोटार सायकल ओढत काढलेल्या निषेध मोर्चाचे नेतृत्व शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांनी केले.

  जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती तुलनेने कमी असतानादेखील तेल कंपन्यांना अंबानी-अदानी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून अन्यायी दरवाढ करण्यास पाठिंबा असलेल्या व देशवासीयांचे कंबरडे मोडणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

  आधीच महागाईचा भस्मासूर व त्यात कोरोनाने उद्भवलेले आर्थिक संकट नागरिकांच्या जीव घेत असताना पेट्रोल व डिझेलच्या दरांत सातत्याने होणारी वाढ नागरिकांना फासावर चाढवणारी आहे. देशातील प्रत्येक घटकाला या इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले असून त्याला सर्वस्वी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याची खरमरीत टीका शिवसेना जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांनी आंदोलनस्थळी केली.

  यावेळी आंदोलनात उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, महिपती पाटील, महिला आघाडी तालुका संघटिका सौ.उषा चौगुले, विभागप्रमुख विनायक विभुते, शहरप्रमुख अमोल देशपांडे, माजी विभागप्रमुख राजेंद्र पाटील, नगरसेवक पिंटू मुधाळे, नगरसेविका सौ.पूनम राजेंद्र पाटील, पट्टणकोडोली शहरप्रमुख आण्णा जाधव, युवासेना तालुका उपअधिकरी संताजी देसाई, युवासेना हुपरी शहर अधिकारी भरत देसाई, महिला आघाडी शहर संघटिका सौ. मीना जाधव, भरत मेथे, अरुण गायकवाड, सागर खोत, संदीप भंडारे, ग्रा.पं.सदस्य महेश कोरवी, इंगळीचे संदीप कदम यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!