ब्रीज बुक हाऊसचा शुभारंभ उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते संपन्न …..

इचलकरंजी /प्रतिनिधी

    स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी उपयुक्त व आवश्यक असणारी पुस्तके व मासिके सवलतीच्या दरात ब्रिज एज्युकेशन सोसायटीमध्ये मिळणार असून त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. व स्पर्धा परीक्षेस सामोरे जाऊन यशस्वी व्हावे . असे आवाहन इचलकरंजी विभागाचे उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी केले ते प्रा.संदीप राणे यांनी सुरू केलेल्या इचलकरंजी येथील ब्रीज बुक हाऊसच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते .
     यावेळी प्रा. राणे यांनी सांगितले , आता स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके आणण्यासाठी पुणे , मुंबईला जाण्याची गरज त्याच किंमतीत ब्रीज बुक हाऊसमध्ये पुस्तके उपलब्ध होतील. या वेळी श्रीधर गोडबोले , ज्योतीराम कवडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते . उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांचा पुस्तक विक्रीस उदंड प्रतिसाद मिळाला . ब्रीज हाऊस इचलकरंजी येथे भाग्यरेखा टॉकी शेजारी वोडाफोन ऑफिस च्या तिसऱ्या मजल्यावर आहे.

error: Content is protected !!