चालु गळीत हंगामात सात लाख मेट्रिक टन ऊसगाळपाचे उद्दीष्ट- मंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर

हातकणंगले / प्रतिनिधी
        शरद सहकारी साखर कारखान्याने शेतकरी हिताला सर्वप्रथम प्राधान्य दिले आहे.त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावर खूप मोठा विश्वास आहे.चालू वर्षीच्या गळीत हंगामासाठीचे उत्तम नियोजन केले आहे. क्रमपाळीनुसार ऊसाची तोडणी केली जाईल.तोडणी वाहतुकीची यंत्रणा सक्षम केली आहे. गळीत हंगामात सात लाख मेट्रिक टन ऊसगाळपाचे उद्दीष्ट ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याशी संबंधित सर्व घटकांच्या सहकार्याने पूर्ण केले जाईल. असा विश्वास महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री व शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांनी व्यक्त केला.

नरंदे येथील शरद साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन करताना आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील (यड्रावकर). यावेळी संचालक डी. बी.पिष्टे,उपनगराध्यक्ष संजय पाटील(यड्रावकर), उपसभापती राजकुमार भोसले, रावसाहेब चौगुले, अप्पासाहेब चौगुले, आदित्य पाटील(यड्रावकर) व उपस्थित मान्यवर


      नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन करण्यात आला. एकोणिसाव्या गळीत हंगामातील अग्नि प्रदीपन मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रावसाहेब चौगुले व धनपाल भोरे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला.
     यानंतर मंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर म्हणाले, कारखान्याने सर्वच गळीत हंगाम पूर्ण कार्यक्षमतेने पार केले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, तोडणी वाहतूकीची तसेच अन्य बिले वेळेवर दिली आहेत.
     यावेळी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील(यड्रावकर), युवा नेते आदित्य पाटील (यड्रावकर), शिरोळ पंचायत समिती सभापती कविता चौगुले, पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार, मीनाक्षी कुरडे, हातकणंगलेचे उपसभापती राजकुमार भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष थबा कांबळे, दशरथ काळे, दादेपाशा पटेल, मल्लाप्पा चौगुले, प्रा. बी. के. चव्हाण, सरपंच रवींद्र अनुसे,संचालक बबन भंडारी,डी. बी. पिष्टे, आप्पासाहेब चौगुले, अजित उपाध्ये,लक्ष्मण चौगुले,रविकांत कारदगे, संजय बोरगावे, आण्णासो सुतार, प्रेमीला मुरगुंडे, राहुल बंडगर, महेश कलगुटकी, संभाजी मोरे, कार्यकारी संचालक एस.एन.डीग्रजे, मुख्यकार्यकारी अधिकारी बी.ए. आवटी आदींसह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!