डॉ. आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी नाम. मुश्रीफ यांचे अभिवादन

कागल / प्रतिनिधी
    भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कागलमध्ये अभिवादन केले. येथील गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार नाम. हसन मुश्रीफ यांनी अर्पण केला.

     यावेळी नाम. मुश्रीफ म्हणाले , समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघर्ष करा व शहाणे व्हा, असा क्रांतिकारी मंत्र दिला. विषमतेने बजबजलेल्या समाजात समता आणि बंधुता नांदावी, या भावनेतून त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्याय या त्रिसूत्रीवर वाटचाल करण्यातच मानवजातीचे कल्याण आहे, असेही ते म्हणाले.
   यावेळी माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, नगरसेवक विवेक लोटे, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरसेवक प्रवीण काळबर, कागल नगरपरिषद उप-अभियंता सुनील माळी, कागल नगरपरिषद कर निरीक्षक अभिजीत गोरे,भगवान कांबळे, माजी नगराध्यक्ष असलम मुजावर, इरफान मुजावर, प्रभाकर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!