गारगोटी सरपंच यांना जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल

गारगोटी /आनंद चव्हाण
गारगोटी-पाटगाव मार्गावरील गारगोटी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढणेस सांगितल्याचे कारणावरून गारगोटीचे सरपंच संदेश पांडुरंग भोपळे यांना ग्रामपंचायत सभागृहात येऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल भुदरगड पोलिसांत एकाविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे . प्रविण प्रकाश भाट (वय वर्ष ३६ रा गारगोटी ) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रविण भाट याचा पाटगाव रस्त्यावर चायनीज खाद्यपदार्थ बनवणे व विक्रीचा व्यवसाय आहे . खाद्यपदार्थ गाडी व डिजिटल बोर्ड रस्त्यावर असलेने वाहतुकीस अडथळा होतो . म्हणून त्यांना नोटीस देणेत आली . व ती गाडी व बोर्ड काढणेस सांगितले . तोच राग मनात धरून आरोपी प्रविण भाट याने ग्रामपंचायत सभागृहात येऊन सरपंच संदेश भोपळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली . शिवाय दुपारी चारचे सुमारास बाजारपेठ येथील नागराज साडी दुकानासमोर पुन्हा शिविगाळ केली . याबाबत सरपंच संदेश भोपळे यांनी भुदरगड पोलिसांत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम १८६ नुसार गुन्हा दाखल केला असून रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेणेचे काम चालू होते .
अधिक तपास पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अनिल चव्हाण करीत आहेत . आरोपी प्रविण भाट याने सरपंच संदेश भोपळे यांनी बाजारपेठ येथे भुदरगड पतसंस्थेसमोर मारहाण केलेची फिर्याद दाखल केली आहे.

error: Content is protected !!