वैचारिक अधःपतन

    महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हे जसे पक्षीय कार्ययंत्रणेच्या संदर्भात गंभीर आहे . तसेच ते एकुणच पदवीधरांच्या वैचारिक प्रगल्भतेच्या पातळीवर ही विचार करावयास लावणारे आहे असेच म्हणावे लागेल.
   त्यामुळे भाजपच्या राजकीय व्युहरचनेतील कमतरतेमुळे हा पराभव गांभीर्याने घेतानाच पदवीधरांच्या अभ्यासक म्हणा किंवा त्यांच्या एकुणच राजकीय, सामाजिक परिस्थितीकडे बघण्याच्या मानसिकसकसतेचाही विचार करणे, हि या ठिकाणी फार महत्त्वाचे वाटते आहे.
   या पार्श्वभूमीवर आता समोर येणाऱ्या प्रतिक्रिया या भाजप विरोधकांच्या उत्साही आणि टीकात्मक असणे स्वाभाविक असल्या तरी, आघाडीला तो आपल्या वैचारिक परंपरेचा हा विजय आहे. अशा उत्साहाने सांगण्यासारखा आहे, असे निश्चितच नाही. कारण तसे म्हणता येईल का याचे हि अवलोकन होणे आवश्यक वाटते.
खरतर आज राज्यातील आघाडी सरकारचा कारभार ज्या पध्दतीने सुरु आहे, त्याचा बारकाईने विचार पदवीधर मतदारांनी करणे आवश्यक होते. विकासाच्या दृष्टीने हे सरकार खरोखरच कार्यरत आहे का ? पुर्वीच्या सरकारपेक्षा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी,
    विद्यमान सरकारची निश्चितच धोरणे ठळकपणे दिसतात का? या विषयी पदवीधर मतदारांनी जाणीव पुर्वक अभ्यास करून आपली भुमिका बजावणे क्रमप्राप्त असताना, त्या विषयी सकारात्मक भुमिका घेतलेली दिसत नाही, किंबहुना तसे मार्गदर्शन अथवा वैचारिक चिंतन झालेले असेल असे म्हणता येत नाही.
त्यामुळे आपल्या बौद्धिक ,वैचारिक क्षमतेपेक्षा राजकीय, सामाजिक भावनिक गटातटाच्या,जातीभेदाच्या,भासमान राजकारणापासून हा मतदार बाहेर येणे आवश्यक आहे,आणि यासाठी भाजपने आपली राजकीय यंत्रणा अधिक सक्षमतेने कार्यरत करणे गरजेचे वाटते.
    गेल्या वर्षभरात आपण कोरोना साथीच्या संकटात भयग्रस्त मानसिकतेतून जात आहोत. आजही ते संकट घोंघावत आहेच. संपूर्ण जग या अशा कठीण प्रसंगात वाटचाल करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण या परिस्थितीचा सामना करीत आहोत,अर्थात हे सर्व कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता संकटाचा सामना करणे महत्त्वाचे आहे. तसा तो केला ही जात आहे. इथे कोणतीच जात, पात, प्रदेश देश बघितला जात नाही. 

      कारण सध्या जगणे महत्त्वाचे ठरत आहे. या प्रकारे माणसांने आपल्या वैचारिकपातळीवरहि जगणे हि महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने पदवीधर मतदारांचे वैचारीक जगणे हरविलेले दिसते. शिक्षण, पदवी, मलिदावान नोकरी, आणि छोकरी या मर्यादित स्वप्नांनी भारवलेल्या विश्वाला,जी व्यापक राष्ट्रीय विचारधारेची तळमळ जाणविणे अगत्याचे वाटते.ती दिसून येत नाही.याचा खेद वाटतो.
      विशेषतःमहाराष्ट्रातील, लोकमान्य टिळक,आगरकर, महात्मा फुले, डॉ . आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, या अनेक समाज सुधारकांबरोबरच अनेक राजकीय नेत्यांनी या देशाला,समाजाला दिशा निदर्शनाचे कार्य केले. त्या महाराष्ट्रातील आजचा पदवीधर मतदार एका संकुचित भुमिकेने सत्तेवर आलेल्या अल्पवयीन आघाडी विचारांना बळी पडते.अशा या पदवीधर मतदारांची कीव करावीशी वाटते.हे एक प्रकारे पदवीधरांचे वैचारिक अधःपतनच म्हणावे लागेल.

         सुर्यकांत देशपांडे,
                   नालासोपारा, ता.वसई (मो.नं.७४९८१५५१९८)

error: Content is protected !!