हेरलेत दलित वस्ती सुधार योजनेच्या विकास कामाचा शुभारंभ

हेरले / प्रतिनिधी
    महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांच्या फंडातून १५ लाख रुपयांचा दलित वस्ती सुधार योजनेच्या विकास कामाचा उद्घाटन शुभारंभ हेरले (ता. हातकणंगले) येथे संपन्न झाला.

हेरले येथे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील व इतर मान्यवर…..

   या प्रसंगी सभापती डॉ. पद्माराणी पाटील म्हणाल्या, रूकडी जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वच गावामध्ये विविध फंडातुन विकास कामे मंजूर करून कामे सुरू आहेत. याच बरोबर हेरले गावासाठी जास्तीत जास्त विविध विकास निधी मंजूर करून गावाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
   दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत हायस्कूल जवळील मातंग समाज वसाहत रस्त्यासाठी १o लाख रुपये विकास निधीचे रस्त्याचे काम सुरू झाले आहे. ५ लाख रूपये संजयनगर खाबडे गल्ली येथे रस्ता करण्याचे काम सुरू झाले. या दोन ठिकाणच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
   प्रसंगी उपसरपंच राहुल शेटे, माजी उपसरपंच संदिप चौगुले, माजी सरपंच रियाज जमादार, ग्रामपंचायत सदस्य सतीश काशिद, मस्जित लोखंडे, संतोष उलसार, दिपक जाधव आदी मान्यवरासह महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!