महावितरणच्या कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरा : मौजे वडगाव शिवसेनेची मागणी

हातकणंगले/ प्रतिनिधी

महावितरण हातकणंगलेचे उपकार्यकारी अभियंता सुरेश मैलापूरे यांना लेखी निवेदन देतांना सुरेश कांबरे व अवधूत मुसळे


     हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील महावितरणच्या शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात हेरले , हालोंडी , मौजे वडगाव या तीन गावांचा समावेश आहे . या तिन्ही गावचे कार्यक्षेत्र पाहता शाखा कार्यालयात अपुरे कर्मचारी आहेत . त्यामुळे रिक्त झालेली पदे तात्काळ भरावीत अशी मागणी मौजे वडगाव शिवसेनेच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे , व शिवसेनेचे ग्रा .पं. सदस्य अवधूत मुसळे यांनी महावितरण हातकणंगले उपकार्यकारी अभियंता सुरेश मैलापुरे यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
    हेरले येथील वीज मंडळाच्या शाखा कार्यालयाच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंता -१ , मुख्य तंत्रज्ञ १, वरिष्ठ तंत्रज्ञ ६ , कनिष्ठ तंत्रज्ञ ३, यासह एकूण ११ पदे मंजूर आहेत . यापैकी काही पदे रिक्त तर काहींची बदली झाली आहे . सध्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता , मुख्य तंत्रज्ञ व कनिष्ठ तंत्रज्ञ अशी तीनच पदे कार्यरत असून बाकीची पदे रिक्तच आहेत . त्यामुळे हेरले शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मौजे वडगाव , हेरले , हालोंडी या तिन्ही गावचे घरगुती व शेती वीज कनेक्शनचा विचार केला असता साधारणतः ५६००पर्यत वीज कनेक्शन आहेत .यामुळे शाखा कार्यालयातील अपूऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वीज ग्राहकांना सेवा मिळण्यावर परिणाम होत आहे . त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरावी अशी लेखी मागणी मौजे वडगाव शिवसेनेच्या वतीने केली असून सदर निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे व शिवसेनेचे ग्रा.पं. सदस्य अवधूत मुसळे यांच्या सह्या आहेत .

error: Content is protected !!