इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात यंत्रणा गतीमान ; नागरिकांना मिळणार अद्यावत सुविधा…..

इचलकरंजी/प्रतिनिधी
       इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे अद्यावत सुविधायुक्त व्हावे. याठिकाणी आरोग्याच्या सर्वच आधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम. प्रकाश आवाडे प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने रुग्णालयाची रचना कशी असावी . या संदर्भातील आवश्यक त्या आखणीसाठी तपासणी व मोजमाप घेण्याचे काम सुरु झाले आहे. आर्किटेक्ट सिकंदर नदाफ हे काम पहात आहेत.

    नगरपरिषदेच्या मालकीचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल चार वर्षापूर्वी राज्य शासनाकडे हस्तांतर करण्यात आले. हे शासकीय रुग्णालय राज्यातील अव्वल रुग्णालय व्हावे, याठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध मिळाव्यात यासाठी आम. आवाडे हे प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. मागील आठवड्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आम . आवाडे यांनी या संदर्भातील विस्तृत माहिती दिली होती.
      आता हे रुग्णालय सक्षम आणि अद्यावत होण्याच्या दृष्टीने त्याठिकाणी रचना करण्यात येणार आहे. त्या संदर्भात आवश्यक ती माहिती व मोजमाप घेण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. आर्किटेक्ट नदाफ व त्यांच्या सहकार्‍यांनी रुग्णालयात जावून आवश्यक तेथील मोजणी करण्याचे काम सुरु केले असून लवकरच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे नवे अद्यावत रुप पाहण्यास मिळणार आहे. तसेच आवश्यक त्या सर्व सुविधाही उपलब्ध होणार असल्याने अत्यवस्थ रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध होणर आहेत.
   दरम्यान, कोविड महामारीच्या काळात आम . प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात आवाडे समर्थक मदत कक्ष स्थापन केला आहे. मागील पाच महिन्यांपासून हे मदत कक्ष कार्यरत असून कपिल शेटके, फरीद मुजावर, विजय पाटील, करण कांबळे, रविकिरण मोरे, जितू पंजवाणी आदी अविरतपणे कार्यरत आहेत. या सर्वांनी या कोविड काळात रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना, नातेवाईकांना आवश्यक ती माहिती देण्यासह उपचार कामातही आवश्यक ते सहकार्य करुन मदतीचा हात देत आहेत.

error: Content is protected !!