जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांची माने केअर कोविड सेंटरला भेट ; व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पेशंटसोबत साधला संवाद

जयसिंगपुर /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा ग्रामीण भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू महाराजांचे वंशज राजे समरजीतसिंह घाटगे यांनी आज शिरोळ तालुक्यातील जयसिंगपुर येथील माने केअर कोविड हॉस्पिटलला भेट देऊन सर्व डॉक्टर्स ,नर्सेस,सर्व कर्मचारी वर्ग यांचे कौतुक अभिनंदन केले .


कोविड पेशंटसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून तब्बेतीची विचारपूस केली . तसेच काही आवश्यकता लागल्यास मदतीचे आश्वासन दिले . यावेळी त्याच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ . अशोकराव माने, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ . नीता अभिजीत माने,भाजपचे शिरोळ तालुकाध्यक्ष व जि.प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे,डॉ अभिजीत माने, डॉ प्रसाद माने, शिरोळचे नगरसेवक डॉ अरविंद माने, श्रीवर्धन माने -देशमुख,पंडित काळे,मिलिंद भिडे,रमेश यळगुडकर,अबिदून मुजावर, गजानन संकपाळ यांसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!