अल्पवयीन मुलीस लावली फूस ; संशयितास अटक ,तीन दिवसांची पोलीस कोठडी

पाटण / ता: ६ – प्रतिनिधी
       तामकडे ( ता. पाटण येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पाटण (रामापूर) येथील संशयित इरफाज अहमद वारूसे याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मुलीच्या वडीलांनी पाटण पोलिसात दिली आहे. दरम्यान या प्रकरणी इरफाज वारूसे याला पाटण पोलिसांनी ताब्यात घेवून कराड येथील न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पाटण पोलिसांनी दिली.
        याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तामकडे येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी शनिवार दि. 3 रोजी राहत्या घरातून नातेवाईकांच्याकडे जाते असे सांगून गेली होती. मात्र ती घरी न आल्याने तिच्या वडीलांनी नातेवाईकांच्याकडे तिचा शोध घेतला असता , ती आपल्याकडे आली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर गावातील काही लोकांनी पाटण येथील इरफाज वारूसे या मुलाशी तिची ओळख असल्याचे सांगून तो मुलगा सातत्याने तिला भेटत असल्याचे मुलीच्या वडीलांना समजले. त्या अनुषंगाने मुलीच्या वडीलांनी इरफाज याच्याकडे फोनवरून मुलीची चौकशी केली असता ती आपल्याबरोबर असल्याचे इरफाज वारूसे याने सांगून फोन ठेवला. त्यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी इरफाजच्या घरी गेलो असता ती त्याच्या घरी असल्याचे आढळून आल्याने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी पाटण पोलिसात दिली आहे.
        तक्रारीनुसार पाटणचे सहाय्यक पोलीस फौजदार संतोष कोळी यांनी चौकशी केली असता सदर मुलगी पाटण येथील एका हायस्कूलला दोन वर्षापूर्वी शिक्षण घेण्यासाठी येत होती. त्यावेळी पाटण (रामापूर) येथील संशयित इरफाज अहमद वारूसे हा तिचा पाठलाग करत होता. यातून दोघांची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत इरफाजने मुलीला तीन आक्टोबर रोजी फूस लावून घेवून गेला. मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून इरफाज वारूसे याचा पाटण पोलिसांनी शोध घेवून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    दरम्यान, इरफाज याला कराड येथील न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील करत आहेत.

error: Content is protected !!