शिक्षक संघाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद -सभापती प्रवीण यादव

हेरले / प्रतिनिधी
      महाराष्ट्र राज्यात शिक्षक संघटनांच्या बाबतीत शक्यतो न घडणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेली असून ती म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेला देवु केलेली अॅम्ब्युलन्स ही सेवा असून शिक्षक संघाचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे .भविष्यातही त्यांनी असेच विधायक उपक्रम राबवावेत . असे गौरवोदगार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी केले.

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने अँम्ब्यूलन्स प्रदान करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल , शिक्षण सभापती प्रविण यादव , प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे ,नेते मोहन भोसले ,जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष लक्ष्मी पाटील व इतर मान्यवर …..

    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील थोरात गटाकडून कोविड बाधित गरीब व गरजू रुग्णांच्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेस सर्व सोयींनीयुक्त सुसज्य ॲम्बुलन्स प्रदान करण्यात आली यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघाचे नेते मोहन भोसले म्हणाले, कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी शिक्षक संघाने ॲम्बुलन्सची सेवा दिलेली आहे. कोरोनाच्या संकट काळात अगदी सुरुवातीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षकांनी एक दिवसाचा पगार देऊन मदतीचा हात दिलेला आहे. तसेच येत्या ४ दिवसात शिक्षकांच्या बैठकीचे नियोजन करून अजून एक दिवसाचा पगार देण्याविषयी चर्चा करणार आहोत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक नक्कीच यासाठी सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.
शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये संघाकडून देऊ केलेल्या मोफत अॅम्ब्युलन्स सेवेमध्ये समाविष्ट असणाऱ्या सुविधांची माहिती दिली. ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल ,प्राथ. शिक्षणाधिकारी आशा उबाळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सोमनाथ रसाळ , जि.प. सदस्य विजय भोजे व राजू भाटळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष एन.वाय .पाटील , शिक्षक नेते बाळासाहेब निंबाळकर ,जिल्हा अध्यक्ष रवीकुमार पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा लक्ष्मी पाटील , प्रसिध्दी प्रमुख नुतन सकट, प्रकाश मगदूम, कास्ट्राइबचे जिल्हा अध्यक्ष गौतम वर्धन, जिल्हा अध्यक्ष जयवंत पाटील, आयलू देसा, श्रेणीक खोत, अरूण चाळके, तानाजी सणगर, प्रकाश सोहनी, रावसाहेब पाटील, रवी भोई , कृष्णात बागडी, शिवाजी रोडे पाटील , भिमराव रेपे, सुनील एडके , विजय भोसले , महादेव गुरव , इंद्रजीत कदम, अशोक चव्हाण , शशिकांत पाटील , रघूआप्पा खोत, भिमराव रेपे ,शिवाजी ठोंबरे, सरदार पाटील , अशोक पाटील , आदी मान्यवरांसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!