रोटरीकडुन गजानन दाजी कुलकर्णी विद्या मंदिरमध्ये साहित्य वाटप

इचलकरंजी / प्रतिनिधी


येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने हॅपी स्कूल उपक्रमांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश एज्युकेशन सोसायटीच्या गजानन दाजी कुलकर्णी मराठी विद्या मंदिरास शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री गिरीश मसुरकर ,संध्या मसुरकर तसेच असिस्टंट गव्हर्नर मनीष मुनोत व क्लबचे पदाधिकारी संजय गायकवाड, प्रकाश कांबळे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री हेमंत कुलकर्णी कौस्तुभ दातार ,प्राची कुलकर्णी ,मुख्याध्यापिका सरिता बंडगर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला . रोटरीच्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश जोशी निलेश कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले .

error: Content is protected !!