सहकारमहर्षी  तात्यासाहेब कोरे स्मृती पर्वकाळातील सर्व कार्यक्रम रद्द- आम. डॉ. विनय कोरे

वारणानगर /प्रतिनिधी
    वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरण पर्वकाळात होणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान, कृषिप्रदर्शन व सद्भावना दौंड यासारखे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केले असल्याची माहीती वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    येथील  वारणा सहकारी विविध उद्योग आणि शिक्षण समुहाच्या निर्मितीतून स्वर्गीय तात्यासाहेबांनी वारणा परिसरामध्ये कृषी उद्योग, सेवा उद्योग, महिला उद्योग आणि शैक्षणिक विकासाची यशोगाथा साकारली. त्यांच्या स्मरणार्थ 
गेली २५ वर्षे धनत्रयोदशी ते १३ डिसेंबर या पूण्यपर्व काळात  विविध क्रिडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान, कृषीप्रदर्शन,  रथोत्सव आदी कार्यक्रम आयोजित केले जात होते.
    मात्र  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केवळ परंपरा खंडित होऊ नये म्हणून वारणा समूहातील संस्थातून स्मृती ज्योत प्रज्वलित करून तात्यासाहेब यांच्या समाधी स्थळावर  परंपरे प्रमाणे नेण्यात येणार आहे. समाधी स्थळी भजन, कोरे कुटुबिंयाच्यावतीने अभिषेक करून अभिवादन करण्यात येणार आहे.
   वारणा परिसरातील गावा-गावातील कार्यकर्त्यांनी वारणानगरला न येता गावातीलच ग्रामपंचायत व विविध संस्थामध्ये तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. असे आवाहन डॉ. विनय कोरे यांनी केले आहे.
यावेळी सुराज्य फौडेशनचे अध्यक्ष एन.एच.पाटील, वारणा दूध संघाचे सचिव के. एम. वाले, वारणा बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजन, प्रा.जीवनकुमार शिंदे यांच्यासह पर्वकाळ समितीचे सदस्य उपस्थित होते.  

error: Content is protected !!