‘माणुसकीची भिंत ‘ उपक्रमास उदंड प्रतिसाद ; ‘ व्हिजन इचलकरंजी ‘ ग्रुप ठरणार गरिबांचा आधार

इचलकरंजी / प्रतिनिधी
    सर्वांच्या बरोबर गरिबांची दिवाळी ही मोठ्या उत्साहात साजरी व्हावी . या उद्देशाने इचलकरंजी येथील व्हिजन इचलकरंजीच्या माध्यमातून माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाचा उत्साहात प्रारंभ झाला. उपक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे वकील धैर्यशील सुतार यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

     गेल्या चार वर्षापासून व्हिजन इचलकरंजी या संस्थेच्या माध्यमातून माणुसकीची भिंत या सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. उपक्रमाच्या माध्यमातून इचलकरंजी शहरातील अनेक गरिबांची दिवाळी उत्साहात साजरी होते. जुने, नवीन कपडे तसेच दिवाळीसाठी फराळ व इतर घरगुती उपयोगी साहित्य जे उपयोगी नाहीत पण समाजातील गरिबांना कदाचित याची खूप गरज असू शकते. असे सर्व साहित्य या संस्थेच्या वतीने गोळा करून शहरातील गरीब नागरिकांना घरोघरी जाऊन वाटप केले जाते. या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे उदंड प्रतिसाद देऊन कपडे व इतर साहित्य दान करून या उपक्रमाला सहकार्य केले. यावेळी व्हिजन इचलकरंजीच्या पदाधिकाऱ्यांनी पणत्या देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी विहिंपचे जिल्हा मंत्री शिवजी व्यास, व्हिजन इचलकरंजीचे कौशिक मराठे, पत्रकार इरान्ना सिंहासने, मुकेश दायमा, महावीर भन्साळी, विजय पाटील, प्रमोद सपाटे, अशोक पाटनी, उल्हास अतितकर, शिवाजी गोरे, विजय कुडचे, गुरुराज निंबाळकर इ. उपस्थित होते.

error: Content is protected !!