हातकणंगले/प्रतिनिधी
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विधेयक धोरण जाहीर केले त्या निर्णयास महाराष्ट्रातील आघाडी सरकारने स्थगिती देऊन शेतकरी वर्गाचे हित न जोपासण्याची भूमिका घेतली.

महाराष्ट्र आघाडी सरकारच्या स्थगिती निर्णयाचा विरोध म्हणून हातकणंगले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला .
यावेळी भाजप जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष अजिंक्य अरुणराव इंगवले, बाळासाहेब गारे, हातकणंगलेचे नगरसेवक रमजान मुजावर, नगरसेवक मयूर कोळी, अमर इंगवले, पंकज बुढ्ढे , राजू सूर्यवंशी, अभिजित चौगुले, विजय जाधव, भावेश पटेल, भाजपा हातकणंगले तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रदीप कदम, अप्पासो कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते .