माजी विद्यार्थ्याकडून वालावलकर हायस्कूलला शैक्षणिक साहित्याचे वाटप

बोरपाडळे / प्रतिनिधी
    कोल्हापूर येथील शां. कृ .पंत वालावलकर हायस्कूलचा माजी विद्यार्थी शैलेश कुंभार याने आपल्या वाढदिवस साधेपणाने साजरा करून शाळेतील गरजू, गरीब व होतकरू पंचवीस विद्यार्थ्यांना लाभ होईल . अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप केले . सर्व साहित्य प्रशालेचे मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकर यांच्याकडे सुपूर्त केले .
     यावेळी मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकर म्हणाले , ज्यावेळी विद्यार्थ्यांचा दानशुरपणा वाढतो. त्याचवेळी शाळेचीही उंची वाढत असते . यावेळी बहुसंख्य माजी विद्यार्थी, ज्येष्ठ शिक्षक सुरगोंडा पाटील, ग्रंथपाल मृदुला शिंदे , सरीता पोवार, पल्लवी गंगधर, सदाशिव -हाटवळ आदी मान्यवर उपस्थित होते .

error: Content is protected !!