विद्यापीठ निर्णयाविरुध्द विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन ; माणुसकी फौंडेशनचा पाठींबा, विद्यापीठ प्रशासनाने मागितली सात दिवसाची मुदत …..

कोल्हापूर / प्रतिनिधी
     प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना आधीच्या गुणवत्तेच्या सरासरी वरून आताच्या कोरोनाच्या काळात परीक्षा न झालेल्या पेपरला गुण दिल्यामुळे, हजारो विद्यार्थी नापास झाले आहेत. व नापास झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या काळात पेपर न घेता सर्वांना पास केले जाईल अश्या बातम्या समोर आल्या होत्या. पण आता त्याच पेपरला विद्यार्थ्यांना नापास केल्यामुळे विद्यार्थी हातबल होण्याच्या मार्गावर आहेत. या अन्यायाने त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी आज शिवाजी विद्यापीठ येथे ठिय्या आंदोलन केले. व शिष्टमंडळातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील प्रशासकांच्या सोबत आपले सर्व मुद्दे मांडले. विद्यापीठातील प्रशासकांनी सात दिवसाची मुदत मागितली. पण दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी भूमिका जाहीर झाली नाही , तर तीव्र स्वरूपात आंदोलन करू असा इशारा माणुसकी फौंडेशनने व विद्यार्थी कृती समितीने दिला.

         यावेळी माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे, प्रथमेश इंदुलकर, आकाश नरुटे, इम्रान शेख, आनंद इंगवले, विद्यार्थी बचाव कृती समितीचे अध्यक्ष आकाश चांदणे, ऋषिकेश चव्हाण, सागर प्रजापती, रंकीत रॉय, अनिकेत चावरे, स्टेफन आवळे, सोमनाथ धुमाळ, अनिकेत धातूंडे इतर सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते

error: Content is protected !!