सोने दरात मोठी घसरण, जाणून घ्या काय आहे आजचा भाव

नवी दिल्ली/ 8 फेब्रुवारी :

  आता लग्नसराईचे दिवस सुरू होतील आणि सोनं-चांदी खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

   मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi commodity exchange) आज सकाळी सोनं (Gold Price Today) आणि चांदीच्या (Silver Price Today) किमती कोसळल्या आहेत. MCX वर सोन्याचा मार्चमधील फ्युचर ट्रेडमध्ये 39.00 रुपयांची घट होऊन तो 47,217.00 रुपयांवर ट्रेड होत होता. तर चांदीच्या मार्चच्या फ्युचर ट्रेडमध्ये 130.00 रुपयांची घट होऊन तो 68,608.00 रुपयांवर ट्रेड होत होता. गेल्या सहा सत्रांपैकी 5 सत्रांमध्ये सोन्याची किंमत कमी झाली आहे. ऑगस्ट 2020 मधील विक्रमी उच्च दर 56 हजार 200 रुपये होता तो आता 9 हजार रुपयांनी घसरला आहे.

error: Content is protected !!