तिर्थक्षेत्रांना जाणाऱ्या मंदीरापर्यंतच्या डांबरी रस्त्यासाठी आमरण उपोषनास सुरवात

हातकणंगले / प्रतिनीधी :
    सांगली -कोल्हापूर मार्गावरील हायवेपासून हातकणंगले येथील रामलिंग फाट्यापासून कुंथुंगिरी , रामलिंग , धुळोबा , अल्लमगिरी व सिध्दोबा या तिर्थक्षेत्राच्या मंदीरापर्यंत उत्कृष्ट दर्जाचा डांबरी रस्ता होणे आवश्यक आहे . सदरचा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून खडेमय व निकृष्ट झालेला आहे . तसेच सदर मंदिराचे ठिकाणी भाविकांसाठी शौचालय , बाथरूम , व भक्तनिवास इत्यादी कामे अर्धवट स्थितीत आहेत . ही सर्व कामे पूर्ण करण्यासंदर्भात पुज्य श्री जगदगुरु बसवकुमार स्वामीजी यांनी वारंवार संबंधीत विभागाकडे मागणी केली होती मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे.


   संबंधीत काम पूर्ण करण्यासाठी बसवकुमारस्वामी यांनी आजपासून हातकणंगले येथील तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषनास सुरूवात केली. जोपर्यंत आपल्याला कामे पूर्ण होण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही. अशी ठाम भुमिका घेतली आहे . आज उपोषनस्थळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत उपोषणाला पाठींबा दिला.

error: Content is protected !!