राष्ट्रउभारणीच्या कार्यात महिलांचे मोलाचे योगदान प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात साजरा

वारणानगर, ता.8
   येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये (Yashwantrao Chavan Warna College) जागतिक महिला दिनानिमित्त (International Women’s Day) विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन च्या प्रशासकीय अधिकारी मेजर गुगामालती ए. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.समारंभास श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे सावकर, प्रशासकीय अधिकारी वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त एनसीसी एन सी सी अधिकारी श्रीमती निशा भोसले- कागल, सौ. सुजाता पाटील यावेळी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

वारणानगर, येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयांमध्ये जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेच्या कोल्हापूर विभागीय प्रशासकीय अधिकारी गुगामालती ए. यांचा सत्कार करताना प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत डॉ. सौ. एस. बी. शहापुरे.सौ. निशा भोसले.

   प्रारंभी दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्राचार्य यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुण्या गुगा मालती म्हणाल्या की,” राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश उभारणीचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरु असून महाविद्यालयातील, तरुण विद्यार्थिनींनी स्वयंशिस्त पाळून भारतीय सैन्यदला बरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी प्राप्त कराव्यात. महिलांनी परिवाराबरोबरच समाज आणि संस्कृती संवर्धनाची जबाबदारी ही तितक्याच सक्षमपणे पेलली असल्याचे त्यांनी सांगितले.
   डॉ. चिकुर्डेकर म्हणाले की,”भारतीय घटनेने महिलांना समानतेचा अधिकार दिला असून राष्ट्रउभारणीच्या कार्यात महिलांनी मोठे योगदान दिले आहे. मिडिया,शिक्षण, राजकारण, अर्थकारण, विज्ञान, आरोग्य, संरक्षण, उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात महिलांनी आपली सक्षमता सिद्ध केल्याचे ही ते म्हणाले.

मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत लेफ्टनंट जयंती गायकवाड, सौ. सुजाता पाटील, डॉ. सौ. सुरेखा शहापुरे, सेवानिवृत्त ऑफिसर निशा भोसले.

    स्वागत प्रास्ताविक लेफ्टनंट सौ. जयंती गायकवाड यांनी केले. यावेळी एनसीसी अधिकारी सुजाता पाटील, डॉ. एस.एस. खोत, डॉ. एस. बी. शहापुरे उपस्थित होत्या. आभार कु. अमृता खाडे हिने मानले.

error: Content is protected !!