कोल्हापूर / प्रतिनिधी
ब्राह्मण समाजाच्या विविध समस्या व मागण्या संदर्भात आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद व ब्रह्मशिखर परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय ब्राह्मण समाजाची गोलमेज परिषद कोल्हापूर येथे पार पडली. ब्राह्मण समाजाला वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल गोलमेज परिषदेमध्ये नाम. जयंत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करून त्यांना ब्रम्हमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला.

यावेळी ब्राह्मण समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा . स्वतंत्र ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे . पुरोहिताना मानधन सुरू करणे. वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करून खाजगी मालकीच्या करून देणे . महापुरुषांच्या बदनामी विरोधी कायदा करणे. स्वातंत्र्यवीर सावरकर , शाहू महाराज आणि आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करणे . पुण्यातील दादोजी कोंडदेव व राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुन्हा बसविणे . श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन येथे स्मारक उभारणे . जिल्हास्तरावर ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करणे. पंढरपुरातील विठ्ठल व रुक्मिणी मंदिरात बडवे उत्पात यांना सेवेकरी म्हणून पुन्हा रुजू करून घेणे. यासह इतर मागण्या संदर्भात राज्यस्तरीय गोलमेज परिषदेतमध्ये चर्चा होऊन मागण्या करण्यात आल्या. यावेळी राज्यातील सर्व ब्राह्मण संघटनांची एक राज्यस्तरीय ‘ब्रह्म महाशिखर परिषद’ या नावाने एकच संघटना गठीत करण्यात आली .
ब्राह्मण महाशिखर परिषदचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांनी ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी सदैव तत्पर राहून ब्राह्मण महाशिखर परिषद सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्यासाठी मी व परिषद सदैव तत्पर रहाणार असुन अनेक संघटनांना एकत्र करून महाशिखर परिषद शासकीय स्तरावरील सर्व कामे लवकरच पुर्ण करतील. अशी ग्वाही दिली.
तसेच मकरंद कुलकर्णी यांनी पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील तसेच गुरव धनगरसह अन्य समाजातील पुजाऱ्यांना शासनाने वेतन चालू करावे. तसेच ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या असक्षम अशा घटकांसाठी आर्थिक विकास मंडळाची स्थापना करावी . अशी मागणी करत सर्वांचे स्वागत केले.
परिषदेला काकासाहेब कुलकर्णी , विश्वजीत देशपांडे , सचिन गाडे-पाटील , गजानन जोशी , सु. द. पुराणिक , दिपक रणनवरे , मिलिंद दामोदरे , श्रीकांत जोशी , महेश पाठक , अॅड. मंदार जोशी , आशिष शुक्ला, सुरेश मुळे, सुरज कुलकर्णी , प्रसाद कुलकर्णी , निलेश कुलकर्णी , विद्याधर कुलकर्णी , कमलाकर देशपांडे , दिलीप धर्माधिकारी , सौ अंजली जोशी , अॅड. आरती सदावर्ते-पुरंदरे , सौ संजीवनी पांडे , सौ ईश्वरी जोशी , सौ स्वाती पातळे , सौ. श्वेता कुलकर्णी ,सौ. प्राची परांडेकर यांच्यासह राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महिला पदाधिकाऱ्यांनी अथर्वशीर्ष पठण करून झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जमदग्नी व प्रदीप अष्टेकर यांनी केले.
