इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी नगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेविकेचे पती विनायक हुक्कीरे यांच्यावर अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांनी खुनी हल्ला केला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून अद्याप प्रकृती स्थिर आहे . ही घटना रात्री उशिरा कोल्हापूर रोड वरील कबनुर गावच्या हद्दीत घडली. हल्लेखोरांपैकी दोघांना रात्री उशिरा अटक केली असुन अन्य संशयित फरारी आहेत. दीपावलीच्या तोंडावर खूनी हल्ला झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
नगरसेविकेचे पती विनायक हुक्कीरे हे कबनूर येथील हॉटेल रविराज येथे जेवायला गेले होते. अचानक चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयता व तलवारीने प्राणघातक हल्ला केला . यामध्ये ते गंभीर झाले असुन फुफ्फुसावर वर्मी वार बसले आहेत . त्यांच्यावर सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत . पैशाच्या देवघेवीच्या वाटाघाटीतुन हल्ला झालेचे प्राथमिक तपासणीत निष्पण झाले आहे. घटनेची माहीती समजताच पोलिस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.अन्य हल्लेखोरांना शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सीसी टीव्ही तपासणीचे काम सुरू होते.