गारगोटी /प्रतिनिधी
येथील श्री . मौनी विद्यापीठ सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दीपावली निमित्त दीपावली भेटवस्तू व लाभांश वितरण करणेत आले.

यावर्षी संस्थेने सभासदांना १२% लाभांश दिला असून दीपावली निमित्त भेटवस्तू तसेच कायम ठेवींवरील व्याज वितरण मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. आर. डी. बेलेकर यांचे हस्ते करणेत आले,
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत चेअरमन विक्रम भोसले यांनी केले ,यावेळी माजी चेअरमन प्रा.रमेश भोकरे, व्यवस्थापक विजय शिंदे, मुख्याध्यापक एम. एस. मोरुस्कर यांचेसह सर्व सदस्य, सभासद उपस्थित होते, शेवटी व्हाईस चेअरमन गुरुनाथ कांबळे यांनी आभार मानले, लाभांश व ठेवींवरील व्याज दिलेने सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे.