चाळीस रुपये उधारी मागण्याच्या कारणावरून खुन; संशयितास पोलीसांनी केली अटक

गांधीनगर /वार्ताहर
   वसगडे ( ता. करवीर ) येथे निव्वळ चाळीस रुपयाची मागील उधारी देण्याच्या कारणावरून दारु पिताना वाद होवून अनिल उर्फ रोहिदास उल्हास कांबळे ( वय २८) याचा गळा दाबून खून केल्याची घटना बुधवार दि ७ रोजी रात्री नऊच्या सुमारास समाज मंदिरात घडली. गांधीनगर पोलिसांनी जगदीश नायकू कांबळे (वय २७ )रा. वसगडे या संशयितास ताब्यात घेतले आहे. या बाबतची फिर्याद उल्हास चुडाप्पा कांबळे यांनी दिली आहे .
     याबाबत अधिक माहिती अशी वसगडे (ता. करवीर ) येथील समाज मंदिरामध्ये अनिल उर्फ रोहीदास कांबळे व जगदीश कांबळे हे दारूच्या नशेत बोलत बसले होते . दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला त्यातुन मागील चाळीस रुपयांच्या उधारीसाठी शिवीगाळ सुरू झाली . त्यानंतर एकमेकांच्या अंगावर जावुन हाणामारी सुरु झाली . झटापटीत जगदीश कांबळे याने अनिल उर्फ रोहीदास कांबळे याचा जोरात गळा दाबला . त्यानंतर जगदीश हा समाज मंदीरातुन पसार झाला . निपचित पडलेल्या अनिलच्या नातेवाईकांनी तात्काळ गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयांमध्ये उपचारासाठी त्याला दाखल केले.

   पण जागेवरच हालचाल बंद झालेल्या अनिलला तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक भांडवलकर , उपनिरीक्षक अतुल कदम, मलमे, मोहन गवळी, चेतन भोंगाळे संदीप सावंत, आकाश पाटील, आयुब शेख, विराज डांगे, सुभाष सुदर्शन आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कृष्णात पिंगळे यांनी संशयित जगदीश कांबळे याला गावातूनच ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर यांनीही भेट दिली. शवविच्छेदन सीपीआरमध्ये केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला . घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

error: Content is protected !!