दूध संघानी संस्था रीबिट दीपावली पूर्वी देण्याबाबतचा आदेश व्हावा -प्रभाकर साळुंखे

नवे पारगाव : प्रतिनिधी    
    राज्यातील सहकारी दूध संघानी गाव पातळीवरील दूध संस्थांचे संस्था रीबिट दीपावली पूर्वी देण्याबाबतचा आदेश शासनाने संघाना द्यावा,अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर साळुंखे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

         प्रभाकर साळुंखे

   निवेदनातील आशय असा आहे, कोविड-१९ ने मार्च२० पासून ग्रासले आहे. यामुळे शासनाने २०१९-२० च्या वार्षिक सर्वसाधारण सभा पुढील आदेश पारीत होईपर्यंत सभा न घेण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. सहकारी संस्थाना लाभांश देण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता बंधनकारक  आहे.
   वार्षिक सभा सहकारी संघाच्या संचालक मंडळास तसेच गावपातळीवरील संस्थांचे संचालकांना दीपावली पूर्वी सभासदांना लाभांश वाटपाचे अधिकार दिल्याचे आदेश पारीत करून गाव पातळीवरील दूध उत्पादकांना दिलासा द्यावा अशीही मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर साळुंखे यांनी केली आहे…..

error: Content is protected !!