वारणा महाविद्यालयात गांधी जयंती आणि सप्ताह विविध उपक्रमाने संपन्न …..

वारणानगर/प्रतिनिधी़
    येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये गांधी जयंती आणि सप्ताह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसर स्वच्छता, शिवनेरी क्रिडांगणावरील गवत निर्मूलन व श्रमदान याचबरोबर ऑनलाइन काव्यलेखन स्पर्धा, प्रतिमापूजन इत्यादी कार्यक्रम सलग सात दिवस उत्साहात संपन्न झाले.
    महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपक्रमास श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळ अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या.
    शिवनेरी क्रीडांगणावरती १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवत सलग चार दिवस श्रमदान केले. श्रमदान संयोजन संचालक प्रा. अण्णासो पाटील यांनी केले.


    महात्मा गांधीजींच्या जीवन आणि कार्याची सखोल माहिती नव्या पिढीला व्हावी . या हेतूने आयोजित केलेल्या ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत महाविद्यालयातील ६० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. महात्मा गांधींच्या जीवन आणि कार्यावर आधारित विविध कार्य विषयावरती विद्यार्थ्यांनी अप्रतिम कविता स्वतः लिहून सादर केल्या आहेत. या स्पर्धेतील विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालय-प्रज्ञा गायकवाड, अमृता भोगले, सायली कुंभार. उत्तेजनार्थ- पृथ्वीराज केकरे.
    कनिष्ठ महाविद्यालय-
    अंजली गायकवाड, प्रेरणा पाटील(प्रथम क्रमांक विभागुन), आदिती जमदाडे ऋतुजा पाटील (द्वितीय क्रमांक विभागून), श्रेणी बुधाळे. उत्तेजनार्थ – मीनाक्षी इंगवले, मोनिका चव्हाण, दीप्ती पाटील. स्पर्धेचे संयोजन डॉ. प्रिती शिंदे, प्रा. दिपाली पाटील, यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. वर्षा रजपुत प्रा. सीमा नलवडे, प्रा. संध्या साळुंखे यांनी काम पाहिले

error: Content is protected !!