8 सप्टेंबर दिनविशेष

१८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी

१९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.

१९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.

१९६६: स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.

२०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.

२००१: लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.

१८३०: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.

१८४६: भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म.

१८८७: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म.

१९०१: दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा जन्म.

१९१८: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.

१९२५: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म.

१९२६: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म.

१९३३: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.

१९३३: इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन.

१९६०: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन.

१९६५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन.

१९७०: मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन.

१९८०: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी यांचे निधन.

१९८१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचे निधन.

१९८२: जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन.

१९९१: कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन.

२०१०: कन्नड व तामिळ अभिनेता मुरली यांचे निधन.

error: Content is protected !!