हातकणंगले/ प्रतिनिधी blood donation
वीर सेवा दल शाखा हेरले (ता. हातकणंगले ) आयोजित व हेरले ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, हेरले डॉक्टर्स असोसिएशन, केमिस्ट व एम.आर असोसिएशन, विविध तरुण मंडळे, सामाजिक संस्था हेरले यांच्या विशेष सहकार्याने महारक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिरात १०९ बॉटल्स संकलन झाले.

आज अखेर वीर सेवा दलाच्या ४१ शाखांच्या माध्यमातून 3000 बॉटल्सचे रक्त संकलन करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी जवाहर साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील, माजी सभापती राजेश पाटील, पोलिस पाटील श्रीमती नयन पाटील, प्रा. राजगोंडा पाटील, माजी उपसरपंच संदीप चौगले, उपसरपंच राहुल शेटे, बक्तीयार जमादार, मेडिकल असोसिएशनचे डॉ.अमोल चौगुले, डॉ. महावीर पाटील, डॉ. आर डी पाटील, डॉ. इम्रान देसाई, डॉ. नितीन चौगुले,डॉ. श्रीनाथ कुलकर्णी, डॉ.अमित पाटील, एम् आर असोसिएशनचे किरण चौगुले, सचिन पाटील, विशाल परमाज, श्रेणिक राजोबा, केमिस्ट असोसिएशनचे अभिषेक मोहिते, संदीप चौगुले, मंदिर समितीचे ए. बी. चौगुले, आदगोंड पाटील, भिमराव चौगुले, अजित चौगुले
, संदेश चौगुले, संकेत पाटील, साहिल पाटील, सम्मेद हणमंत, अरिहंत परमाज, अभिषेक पाटील, आशिष माणगावे, यश परमाज यांच्यासह मान्यवर व वीर सेवा दल,वीर महिला मंडळ कार्यकर्ते आदी उपस्थित होते.