सर फाऊंडेशनच्या ‘नावीन्याची आस, त्यास सृजनाचा ध्यास’ या प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर

कोल्हापूर/प्रतिनिधी
  सर फाऊंडेशन (Sir Foundation) च्या वतीने ‘नावीन्याची आस, त्यास सृजनाचा ध्यास’ या प्रकल्पांतर्गत शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. आठ शिक्षकांच्या उपक्रमाची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा समन्वयक श्रीमती रंजिता काळेबेरे व श्रीमती वर्षा निशाणदार यांनी दिली.
  लॉकडाऊन (Lockdown) काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्या उपक्रमांची माहिती इतरांना होण्यासाठी व प्रयोगशील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण 33 शिक्षकांनी सहभाग नोंदवून आपले नावीन्यपूर्ण प्रयोग सादर केले. त्यातून प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ पाच क्रमांक काढण्यात आले. हा प्रकल्प जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर चे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख सर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा उबाळे मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. किरण लोहार सर, सर फाऊंडेशन राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ व महिला समन्वयक श्रीमती हेमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका समन्वयक, जिल्हा समन्वयक श्रीमती रंजीता काळेबेरे व सौ. वर्षा निशाणदार, राजकिरण चव्हाण यांनी परिश्रम घेतले. यशस्वी शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे…

प्रथम क्रमांक
श्री अमर शिवाजी परीट
शाळा – विद्या मंदिर तांदुळवाडी, ता. पन्हाळा.
उपक्रम – घरे बनलीत प्रयोगशाळा

द्वितीय क्रमांक
श्रीमती शकुंतला भाऊ सुतार
शाळा – मराठी विद्या मंदीर, रामनगर, ता.चंदगड
उपक्रम – शिक्षण आले दारी, ज्ञानगंगा घरोघरी

तृतीय क्रमांक
कु रेश्मा अब्दुल रशीद पटवेगार
शाळा – विद्या मंदिर कोगीलखुर्द, ता. करवीर.
उपक्रम – ऑनलाईन स्टडी विजेता

उत्तेजनार्थ पहिला क्रमांक
श्री विनायक राजाराम चौगले
शाळा – विद्या मंदिर वाघापूर, ता. भुदरगड.
उपक्रम – आमची शाळा सुरू आहे

उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक
श्री रविंद्र मनोहर केदार
विद्या मंदिर यादववाडी, ता. करवीर.
उपक्रम – ऑनलाइन ग्रेट भेट

ऊत्तेजनार्थ तिसरा क्रमांक
श्री विश्वास बंडू भोसले
शाळा – विद्या मंदिर, मांडूकली
ता. गगनबावडा.
उपक्रम – स्मार्ट स्टूडेंट, स्मार्ट इंग्लिश

उत्तेजनार्थ चौथा क्रमांक
श्री अभिजीत मधुकर नेजकर
शाळा – विकास विद्या मंदिर, इचलकरंजी, ता. हातकणंगले.
उपक्रम – ओपन डे स्टुडंट्स अॅक्टिविटी

उत्तेजनार्थ पाचवा क्रमांक
सौ सुषमा नागरगोजे
शाळा – विद्या मंदिर येळाणे, ता. शाहूवाडी.
उपक्रम – व्हॉटस्ऍप द्वारे अभ्यास करू, ऑनलाईन चाचणी सोडवू.

error: Content is protected !!