गृहराज्यमंत्री सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह ; कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन- मंत्री पाटील

कोल्हापूर / प्रतिनिधी
   राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापुर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाची लागण झाली असल्याचे सोशल मिडीयावरुन माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांनी माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत.

     मंत्री सतेज पाटील यांनी , मी लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन. असेही ट्विट केले आहे.
काही महिन्यापुर्वी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच मध्यंतरी सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी मुंबईत उपचार घेतले होते. कोल्हापुर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असताना जिल्ह्यातील अनेक नेत्यांना कोरोनाने गाठले होते. पण, यातून एकमेव सतेज पाटील बचावले होते. मात्र अखेर त्यांनाही कोरोनाची लागण झालीच.

 

error: Content is protected !!