आत्मनिर्भर समाज निर्मितीसाठी स्त्री सबलीकरण आवश्यक सरपंच मंदाताई धुमाळे : महिला दिन साजरा

इस्लामपूर /प्रतिनिधी

आदर्श माता आनंदीबाई पाटील यांचा सत्कार करताना सरपंच मंदाताई धुमाळे, भारती पाटील, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील व अन्य.

  सक्षम व आत्मनिर्भर समाज निर्मितीसाठी स्त्री सबलीकरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरपंच मंदाताई धुमाळे यांनी व्यक्त केले. त्या कापूसखेड ता. वाळवा येथे ग्रामपंचायत कापूसखेड व महिला समुपदेशन केंद्र , निर्भया पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी उपसरपंच बाबासाहेब पाटील, ग्रामसेवक तानाजी जकाते, ग्रामपंचायत सदस्या भारती पाटील,माजी उपसरपंच राजेंद्र पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान लवटे,मनाली पवार, सुनिता साळुंखे, संपत वारके, आक्काताई नलवडे, संभाजी शिंदे, शंतनू ढवळीकर, पो. हे. काँ. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  यावेळी प्रतिकूल परिस्थितीत मुलीला शिक्षण देत तीला नायब तहसीलदार पदी बनवले. याबद्दल आदर्श माता आनंदीबाई आनंदराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. धुमाळे म्हणाल्या, स्त्रिया आपले विशिष्ट ध्येय घेऊन कर्तव्य बजावत असतात. समृद्ध समाज निर्मितीसाठी स्त्री सबलीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना स्वातंत्र्य तसेच सन्मान देणे गरजेचे आहे. सुनिता साळुंखे म्हणाल्या, स्त्री ही धैर्य व शौर्याची मूर्ती आहे. ती सबला व सामर्थ्यवान आहे. आजच्या स्त्रीने आपल्या आवडत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून प्रगती साधावी. सोबतच समाजसेवेच्या माध्यमातून समाजही घडवावा. यावेळी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका उपस्थित होत्या.

error: Content is protected !!