इस्लामपूर / प्रतिनिधी

लाडेगाव ता. वाळवा येथील ग्रामपंचायती च्या वतीने जागतिक महिलादिन साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी मध्ये गावात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनिला महिलादिना दिवशी एक दिवसाचा सरपंच होण्याचा मान दिला जातो.यावर्षी चैत्राली नागेश देसाई हिला यावर्षी मान मिळाला. या दिवशी सरपंच रणधीर पाटील यांनी तिला सरपंचाच्या खुर्चीवर बसून दिवसभराचे कामकाज नूतन सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी सहा महिण्याच्या आतील मुलींचा जन्म झाला असेल अशा सर्व मुलींचे स्वागत ड्रेस देऊन करण्यात आले दरम्यान महिला दीना निमित्त रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धा घेण्यात आल्या.
सरपंच रणधीर पाटील म्हणाले,महिलांना समाज्यामध्ये सन्मान मिळावा व त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा तसेच महिलांचा दिवस आनंदित जावा यासाठी दरवर्षी महिला दिन आयोजित केला जातो. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली पाटील,अनिता पाटील, नम्रता पाटील, सोसायटी माजी चेअरमन सदस्या शुभांगी पाटील,ग्रामसेवक डी. पी. सिंग,जयसिंग कांबळे अंगणवाडी सेविका रुपाली पाटील, भारती पाटील अलका देसाई, मदतनीस छाया गावडे,आशा कांबळे,आशा वर्कर दीपाली दाईनगडे, सुषमा कांबळे, व सर्व सदस्य व महिला उपस्थित होत्या.