‘श्रद्धा’चे 94 विद्यार्थी डॉ होमी भाभा परीक्षेस पात्र

   मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. श्रद्धा इन्स्टिट्यूटचे तब्बल ९४ विद्यार्थी हे प्रॅक्टिकल परीक्षेस पात्र झाले आहेत.यामध्ये श्रद्धा फोर इअर प्रोग्रॅमचे ६६ व श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूलचे २८ विद्यार्थी आहेत. 

     संस्थेचे अचूक नियोजन, विद्यार्थ्यांची मेहनत, अभ्यासातील विविध क्लृप्त्या, सततचा सराव यामुळेच विद्यार्थ्यांनी एवढे मोठे यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष ए. आर. तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे समन्वयक एम. एस. पाटील, सुप्रिया कौंदाडे, संगीता पवार, अक्षय तांबे, अभिषेक तांबे, सृष्टी तांबे आदींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
error: Content is protected !!