अल्पवयीन मुलांनी 3 वर्षीय चिमुरड्याला विहिरीत ढकलले

  बालगुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी आता पालकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय नुकताच पुणे पोलिसांनी घेतला होता. याला काही दिवस होत नाही तोच पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कुदळवाडी परीसरात एका 3 वर्षीय चिमुरड्याला काही अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलून दिल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

  पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परीसरात एका ३ वर्षीय चिमुरड्याला काही अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. चिखली पोलिस आणि पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या चिमुरड्याची शोध मोहीम सध्या सुरू आहे. सोमवारी सायंकाळी घराजवळ असलेल्या विहिरीजवळ ही मुले खेळत होती आणि त्याच दरम्यान खेळता खेळता त्यांनी त्याला विहिरीत ढकलून दिले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वसीम नाज्जी मुद्दिन खान असं या तीन वर्षीय मुलाचे नाव आहे. हा मुलगा विहिरीत पडला असल्याची माहिती इतर मुलांनी आणि कुटुंबीयांनी दिली आहे. या घटनेत त्याचा मृत्यू देखील झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येतीय.
error: Content is protected !!